पाथर्डी - अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित पाथर्डी तालुकास्तरीय
विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन कार्यक्रम पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे श्री
विवेकानंद विद्या मंदिर व बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी येथील क्रीडांगणावर नुकतेच
उत्साहात संपन्न झाले.
कोरोना सारख्या
महामारीनंतर दोन वर्षानी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय
यांच्यावतीने घेण्यात येत आहेत.यामुळे शाळेच्या क्रीडांगणावरील खेळाडूंचा उत्साह
प्रचंड दिसून येत होता.तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेची सुरुवात कबड्डी या
क्रीडा प्रकाराने झाली.या स्पर्धेमध्ये 14
वर्षे वयोगटातील 26 संघ, 17 वर्षे
वयोगटातील 24 संघ व 19 वर्षे वयोगटातील सहा संघांनी सहभाग घेतला. यावेळी पार्थ विद्या
प्रसारक मंडळ व तालुका क्रीडा समिती यांच्यावतीने सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक तसेच
पदोन्नती क्रीडाशिक्षक यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तालुक्यातील सर्व
खेळाडूंचे व शिक्षकांचे स्वागत पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड
प्राचार्य डॉ. जी. पी.ढाकणे, मुख्याध्यापक शरद मेढे व पर्यवेक्षक संपत घारे यांनी केले.कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन समन्वयक ज्ञानेश्वर गायके यांनी केले,
प्रास्ताविक राजेंद्र शिरसाठ तर आभार प्रा.
रमेश मोरगावकर यांनी मानले. स्पर्धा पार पाडण्यासाठी रावसाहेब मोरकर, सचिन शिरसाठ,प्रमोद हंडाळ, अजय शिरसाट, अविनाश घुगे,एकनाथ पालवे, सतीश डोळे, प्रा. विजय देशमुख
यांनी परिश्रम घेतले.
0 Comments