खेळामुळे मुलींमध्ये आत्मविश्वासाची निर्मिती - कविता आव्हाड

 

पाथर्डी -  अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित पाथर्डी तालुकास्तरीय शालेय कबड्डी (मुली )या क्रीडा स्पर्धा पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे श्री विवेकानंद विद्यामंदिर व बाबुजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी येथील क्रीडांगणावर उत्साहात संपन्न झाले. कोरोना महामारी नंतर दोन वर्षांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अहमदनगर जिल्हा कार्यालयांच्या वतीने घेण्यात येत आहेत या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

कोरोना महामारी नंतर दोन वर्षांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अहमदनगर जिल्हा कार्यालयांच्या वतीने घेण्यात येत आहेत या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी मुली या क्रीडा प्रकाराचे उद्घाटन नुकतेच झाले. या स्पर्धेमध्ये  14 वर्षे वयोगट 17 संघ,17 वर्षे वयोगट12 संघ, 19 वर्षे वयोगट 8 संघांनी सहभाग घेतला.


यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या सदस्या तसेच मैत्रयी ग्रुपच्या अध्यक्षा कविताताई आव्हाड यांनी स्पर्धेतील विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्याचबरोबर पाथर्डी शहरातील प्रसिद्ध उद्योजिका प्रांजल दराडे यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देताना आपल्या ही शालेय जीवनातील विविध स्पर्धेमधील अनुभव सांगून मैदानी क्रीडा स्पर्धेमुळे सुदृढ आणि निरोगी शरीर निर्माण होते   म्हणून सर्वांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाले पाहिजे अशा शुभेच्छा दिल्या. 


यावेळी व्यासपीठावर पाथर्डी शहरातील नामवंत उद्योजिका शारदा भागवत, वर्षा गुगळे, निता जिरेसाळ, मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी उपस्थित होत्या त्याचबरोबर आसाम रायफल मध्ये नुकतीच निवड झालेली श्री विवेकानंद विद्या मंदिर ची माजी विद्यार्थिनी व बाबूजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा येळाई हिला सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी करणाऱ्या सर्व पंचांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेखा चेमटे यांनी व आभार  अर्चना दराडे यांनी मानले.तर सूत्रसंचालन रेश्मा सातपुते यांनी केले.


Post a Comment

0 Comments