मिरी - कोणत्याही पक्षात पक्षनिष्ठा महत्वाची असते, मागील पंचवार्षिक निवडणुकीत आपला थोड्या मताने पराभव झाला.
पण यावेळेस पक्षाने विश्वास टाकल्यास तो सार्थ ठरवुन आमदार म्हणुन मायभूमीत येईल असा विश्वास संजय डोळसे यांनी मिरी येथे झालेल्या
सत्कारास उत्तर देताना व्यक्त केला.
पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथील ना.रामदास आठवले यांचे निकटवर्ती असलेले संजय
डोळसे यांची रिपब्लिकन पार्टी आहे इंडिया आठवले गटाच्या दक्षिण मध्य मुंबईच्या
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मिरी परिसराच्यावतीने त्यांचा मिरी येथील राजा
वीरभद्र मंदिरासमोर पारंपारिक पध्दतीने घोंगडी, फेटा, काठी देवुन नागरी
सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना संजय डोळसे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सदस्य राहुल गवळी होते. आपल्या
प्रमुख भाषणात संजय डोळसे पुढे म्हणाले,कोणत्याही पक्षात पक्षनिष्ठा महत्वाची असते, पक्षनिष्ठेचे फळ मिळते असते. मागील
निवडणुकीत आपला अतिशय थोड्या मताने पराभव झाला होता. यावेळी पक्षाने आपल्यावर
विश्वास टाकल्यास आपण आमदार होवुन मायभुमीत येवु असा विश्वासही त्यांनी यावेळी
बोलुन दाखविला. या कार्यक्रमात राहुल गवळी, महादेव कुटे, विजय कुटेसह अनेकांनी भाषणे करुन डोळसे यांच्या कार्याचा
आढावा घेतला.
या कार्यक्रमास पं.स.सदस्य राहुल गवळी, माजी सरपंच आदिनाथ सोलाट, महादेव कुटे, जनार्धन मिरपगार, नारायण सोलाट, घनश्याम, विजय कुटे, विष्णु सोलाट, एकनाथ झाडे, अशोक धोंगडे, विजय गुंड, भागिनाथ गवळी, गौतम मिरपगार, गणेश कोरडे, साईनाथ कोरडे, जावु झाडे, डाॅ. गाडे, अझर शेख, जालिंदर शिंदे, राबणारे, सलिमभाई, बंडु तोगे, पठाणभाई, महादेव शिरसाठ, देविदास कोरडे, शिवाजी जाधव, बाबु खाडे, महेश सोलाट,दत्ता मिरपगार, दिनेश पटेकरसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर
होते.
0 Comments