आपसातील वाद टाळुन भगवंताशी संवाद साधावा - विवेकानंद शास्त्री

करंजी - आपसात वाद घालीत बसण्यापेक्षा परमेश्वराशी संवाद साधा, त्यामुळे आपणास परमेश्वर भेटेल असा उपदेश ह.भ.प. विवेकानंद शास्त्री यांनी लोहसर येथील श्री कालभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. 

पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथे सालाबादप्रमाणे श्री काळ भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची कीर्तने आयोजित केली आहेत. या कार्यक्रमात विवेकानंद शास्त्री शिरुर कासार संस्थान आपल्या किर्तनात उपदेश करताना पुढे म्हणाले, आपसातील वाद टाळुन भगवंताशी माणसांनी संवाद साधावा, माणस माणसाबरोबर संवाद साधत नाही तर वाद घालतात हे टाळुन देवाबरोबर संवाद साधल्यास त्याचे निश्चित चांगले फळ मिळेल. जिवनात चांगल्या गोष्टी आचरणात आणा, जिवन जगत असताना चांगले जिवन जगा,माणसाचा देह दुर्लभ आहे.व्यसनाच्या आहारी जावु नका असे सांगुन शास्त्री पुढे म्हणाले, टी.व्ही. व मोबाईलमुळे लहान मुलावर वाईट संस्कार होत आहेत, वाईट संस्कारामुळे तरुण पिढी संकटात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.   


या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व भजनी मंडळ यांच्या सहकार्यातून होत आहे. श्री काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गिते, सचिव विश्वस्त रविंद्र देवा जोशी, रावसाहेब वांढेकर, डाॅ. गिते, राजेंद्र दगडखैर, पाटे मामा, बाबासाहेब गिते आदींनी परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments