शेवगाव : तालुक्यातील खरडगाव शिवारातीन नानी नदी पात्रात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतुक करणा-या जेसीबी व डंम्परवर कारवाई करत २६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांच्या या कार्यवाहीने शेवगाव महसूल विभागाच्या अ-कार्यक्षमतेचे पितळ उघडे पडले आहे.
शेवगाव
उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या पथकाने शुक्रवार ता.११ रोजी पहाटे ६
च्या सुमारास खरडगाव ता. शेवगाव येथील नानी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर धडक
कार्यवाही करत जेसीबी व डंपर असा २६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला मुद्देमालात एक
पिवळया रंगाचा विना क्रमांकाचा जेसीबीच्या मदतीने अश्याप सुलेमान शेख हा वाळू उपसा
करतांना आढळून आला तर गणेश चंद्रकांत केदार हा विनाक्रमांकाच्या आकाशी रंगाच्या
डंपर मध्ये तीन ब्रास वाळू वाहतूक करताना आढळून आला त्यामुळे पोलीसांनी या प्रकरणी
आरोपी शेख व केदार यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदरील ही कारवाई
पोलीस अधिक्षक राकेश ओला,
अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या
मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या पथकातील पोलीस
उपनिरीक्षक ए.एल भाटेवाल,
हे.काँ. सुरेश औटी, पो. काँ. नितीन शिरसाठ,
नितीन चव्हाण, सचिन काकडे,
विलास उकीर्डे या पथकाने केली.
गौण खनिज चोरीतून शासनाचा मोठा महसूल चोरला जातो,गौण
खनिज चोरी करून मोठ्या प्रमाणावर अल्पावधीत पैसा कमावला जातो त्यातून गुन्हेगारी
वाढीस लागते व ती पोलिसांची डोकेदुखी ठरते गौण खनिज चोरी हा विषय महसूल विभागाच्या
अखत्यारीत येतो मात्र याबाबत शेवगाव तहसीलदार यांची भूमिका गेल्या अनेक दिवसा
पासूनच्या तालुक्यातील घडामोडी पाहता कुचकामी दिसते त्यामुळे पोलिसांना महसूलच्या
हद्दीत,अधिकार क्षेत्रात सर्जिकल स्टाईक करून गौण खनिज चोरावर कार्यवाही करावी
लागते हि लक्षवेधी बाब महसूल मंत्री यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. पोलिसांच्या
सदरील कार्यवाहीने शेवगाव तहसील ने गौण खनिज चोरी कडे केलेले दुर्लक्ष उघड झाले
असून शेवगाव महसूल विभागाच्या भोंगळ कारभाचा पडदा पाश झाला आहे.
0 Comments