पाथर्डी - बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे विदयार्थी पै. अनिल लोणारे
याने दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत उत्तम
कामगिरी करत ९२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. यापूर्वी अनिलची हिसार
(हरियाणा) येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली होती.
तसेच निखिल आव्हाड याने
बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स
स्पर्धेत १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक
मिळवला. नुकत्याच बिलासपूर, (छत्तीसगड) येथे २३ वर्षाखालील झालेल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स
स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. या यशाबद्दल पार्थ विद्या
प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड,
उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे यांनी खेळाडूंचे
अभिनंदन केले. त्यांना
शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख व प्रा. सचिन शिरसाट यांचे मार्गदर्शन
लाभले.
0 Comments