मिरी प्राथमिक आरोग्य केंद्रच पडले आजारी, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा !


मिरी - कर्मचाऱ्यांची  रुग्णांना उध्दट उत्तरेकर्मचारी रुग्णालयात हजर नसल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीतरुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अशा अनेक तक्रारीमुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी पडले असुन या रुग्णालयातील कारभारात येत्या आठ दिवसात सुधारणा न झाल्यास मिरी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.पाथर्डी तालुक्यातील मिरी हे पश्चिम भागातील बाजारपेठेचे गाव आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी असते.परंतु मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी दुर्दशामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कायम गैरहजर असतात, आरोग्य केंद्रात परिसरात परिसरात घाणीचे साम्राज्य  पसरले असुन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी पडले असल्याने या आरोग्या केंद्रात रुग्णावर उपचार कसे होणार ? असा सवाल मिरीच्या सरपंच सुनंदा गवळी यांनी केला आहे. 

मिरीच्या महिला सरपंच सुनंदा गवळी यांनी रुग्णांच्या तक्रारीवरुन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवुन कर्मचाऱ्यांची बैठक घेवुन कर्मचार्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचुन दाखविलापरंतु आठ दिवसांनंतरही या रुग्णालयाच्या कारभारात कोणतीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात सुधारणा न झाल्यास आपण ग्रामस्थासह प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकणार असुन पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्याच्या दालनासमोर बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा सरपंच सौ. सुनंदा गवळी,उपसरपंच संजय शिंदे,जालिंदर गवळी,सुभाष गवळी,अदिनाथ सोलाट,संभाजी झाडे,विजय गुंड तसेच सुनिल औताडेबाप्पु मिरपगार अदिनाथ वाघसह अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी एका लेखी निवेदनाव्दारे दिला आहे. मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारात परिसरातील नागरिक कंटाळले असुनरुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने परिसरातील रुग्ण व नातेवाईकावर वाईट प्रसंग उद्भवण्याची घटना घडल्या असल्याचे मिरीचे सरपंच सौ.सुनंदा गवळी यांनी सांगितले.तसेच गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आपण लवकरच चौकशी करुन दोषीकामचुकार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करु असे सांगितले.


Post a Comment

0 Comments