भीख मांगो आंदोलनाची रक्कम गडकरी यांना पाठवणार !

               

पाथर्डी - तालुका हद्दीतुन जात असलेल्या कल्याण-  विशाखापट्टणम (निर्मल) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक्र ६१ चे गेल्या ७ वर्षापासुन रखडलेल्या कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रचंड खड्डे व धुळीचे साम्राज्यामुळे हा रस्ता असुन अडचण नसुन खोळंबा झाला आहे याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाचा जाहिर निषेध करत भिक मागो आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के महिला तालुकाध्यक्ष रोहिणी ठोंबे आदिंनी केले. शहरातील कसबा येथील पोळा मारूती मंदिरापासुन पोतराजाला साज घालुन वाजत गाजत घोषणा देत आंदोलनाला सुरवात करण्यात आली.रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या दुकादारांसह नागरिकांकडून पैशाच्या रूपात भिक मागण्यात आले.जुन्या बसस्थानक परिसरातील स्व.वसंतराव नाईक चौकात आंदोलन करण्यात आले.


यावेळी अरविंद सोनटक्के, वंचितच्या महिला तालुकाध्यक्षा रोहिणी ठोंबे, शिवसेनेचे सचिन नागापुरे,काँग्रेसचे महेश दौंड, सुखदेव मर्दाने आदिंनी तीव्र भावना व्यक्त करत प्रशासन, ठेकेदार, व लोकप्रतिनिधी यांच्यावर टिका केली. भिक मागो आंदोलनात नागरिकांकडून, ५८० रुपये रोख स्वरूपात जमा झालेली रक्कम आंदोलकांनी उपअभियंता स्मिता पवार यांना स्विकारण्याचा आग्रह केला. मात्र पवार यांनी ही रक्कम ठेकेदाराला द्या असे सांगुन स्वीकारण्यास नकार दिला. त्यावर सदरची रक्कम मनिऑर्डरने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठवुन देवु असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग पाथर्डी उपविभागीय कार्यालयाच्या उपअभियंता स्मिता पवार यांनी आंदोलनाला सामोरे जाऊन राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत सबंधित ठेकेदाराला नोटिस दिली असुन डिसेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत याबाबत वरिष्ठ पातळीवर ठोस निर्णय होणार असुन डिसेंबरमध्येच रस्त्याच्या कामाला वेगाने व पुर्ण क्षमतेने सुरवात होऊन रस्त्याचे काम लवकर पुर्ण होईल असे अश्वासन दिले.त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात  राजु पठाण, सुनिल जाधव, सोपान भिंगारदिवे, सोपान बिडवे, इरफान शेख, किशन फतपुरे, सलीम मनियार, मनिष उबाळे, सुरेश हुलजुते यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. राष्ट्रीय महामार्ग पाथर्डी उपविभागीय कार्यालयाच्या उपअभियंता स्मिता पवार यांच्या अश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 


Post a Comment

0 Comments