वीरेंद्र भालसिंग यांना ब्रांच मॅंनेजरपदी पदोन्नती

                                       

शेवगाव - बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरूर बुद्रुक (ता. शेवगाव) शाखेचे हेड कॅशियर वीरेंद्र भालसिंग यांची औरंगाबाद विभागात ब्रँच मॅंनेजरपदी बढतीवर बदली झाली आहे. वरूरचे ब्रांच मॅनेजर नवनाथ धाडगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दिं 22 रोजी) श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात पार पडलेल्या छोटेखानी समारंभात श्री.भालसिंग यांना निरोप देण्यात आला.

भालसिंग हे शेवगावचे रहिवासी असून सन २०११ मध्ये ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या चापडगाव (ता.शेवगाव) शाखेत क्लार्क म्हणून रुजू झाले.प्रसिद्ध विधीज्ञ शंकरराव भालसिंग व आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालयाच्या उप मुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग यांचे ते सुपुत्र आहेत.अडीच वर्षाच्या सेवेनंतर सन २०१३ मध्ये ते वरूर शाखेत हेड कॅशियर म्हणून रुजू झाले. वरुर शाखेत त्यांनी सभासद खातेदारांना चांगली सेवा दिली तसेच बँक व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने लोकाभिमुख कामगिरी केली.अत्यंत कमी वयात त्यांची ब्रांच मॅंनेजरपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

भालसिंग यांना पदोन्नती मिळाल्याने वरुर ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच गोपाळ खांबट तसेच महाराष्ट्र बँकेचे वतीने ब्रांच मॅनेजर नवनाथ धाडगे यांच्या हस्ते त्यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सारंगधर खैरे,निवृत्ती चव्हाण,उमेश खांबट,सुभाष पलोड,नितीन वावरे,बालू सोनटक्के,महिला बचत गट समन्वयक (सीआरपी) मीना खैरे,‌युन्नूस सय्यद,बँक कर्मचारी हरिभाऊ चितळे, कैवल्य कुलकर्णी आदी उपस्थित होते. वरूर सेवा सहकारी सोसायटीचे संचालक जगन्नाथ गोसावी यांनी प्रास्ताविक तर,बँक मित्र किरण म्हस्के यांनी आभार प्रदर्शन केले.


Post a Comment

0 Comments