सु-संस्कारा मुळे महिला अत्याचार कमी होण्यास मदत होईल - न्यायाधीश एम.डी.गौतम

पाथर्डी – स्त्रियावरील अत्याचाराच्या घटना थांबवायच्या असतील तर कायद्या सोबत मुलावर घरातून होणारे संस्कार महत्वाची भूमिका बजावतात, सु-संस्कारित पिढी ही दुसऱ्यांचे कायदेशीर हक्क व अधिकारांचे हनन करत नाही,सु-संस्कारा मुळे महिला अत्याचार कमी होण्यास नक्कीच मोठी मदत होईल असे प्रतिपादन पाथर्डी न्यायालयाचे न्यायाधीश श्री एम.डी.गौतम यांनी केले.

पाथर्डी तालुका विधी सेवा समिती आणि पाथर्डी वकील संघाच्या वतीने आजादीका अमृत महोत्सव या अभियाना अंतर्गत पाथर्डी तालुक्यात दिनांक ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या कायदेविषयक जनजागृती मोहिमे दरम्यान आज पाथर्डी तालुक्यातील आगसखांड येथे मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश श्री एम.डी.गौतम बोलत होते.यावेळी न्यायाधीश गौतम यांनी महिलांचे कौटुंबिक छळ,अत्याचार थांबवण्या बाबत कायदेविषयक सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी आगसखांड गावचे सरपंच पांडुरंग लाड,उपसरपंच दादा घुले,वकील संघाचे अध्यक्ष अॅड.राजेंद्र खेडकर, अॅड.आंबादास खेडकर,अॅड.य्याज शेख,अॅड.आत्माराम वांढेकर,अॅड.निलेश दातार, अॅड.एन.बी.जायभाय,न्यायालयीन कर्मचारी गणेश दानवे,दत्ता गोबरे यांच्या सह ग्रामस्त उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॅड.नितीन वायभासे यांनी तर अॅड.डी.एस पालवे यांनी आभार मानले.

 

Post a Comment

0 Comments