बाळासाहेब ठाकरे स्मृती दिना निमित्त रक्तदान शिबीर

पाथर्डी - बाळासाहेब ठाकरे स्मृती दिना निमित्त शहरात युवासेना शहरप्रमुख शिवव्याख्याते सचिन नागापुरे व श्री संत नरहरी महाराज सर्व सुवर्णकार मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीरा मध्ये २२ रक्तदात्या नी सहभाग नोंदवला. 

यावेळी माधवबाबा यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले कि रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, एका माणसांनी रक्तदान केले तर तो एक जीव वाचवतो म्हणजे महापुण्याचं काम करतो. प्रत्येक माणसांनी रक्तदान केले पाहिजे. असे प.पू.माधवबाबा यांनी सांगितले व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या या रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन शंकर महाराज मठाचे मठाधिपती प.पू.माधवबा यांच्या हस्ते झाले. 


यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना नेते विष्णूपंत पवार,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाअध्यक्ष शिवशंकर दादा राजळे, काँग्रेस तालुकाअध्यक्ष नासिरभाई शेख, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाउपाध्यक्ष अरविंद सोनटक्केमाजी नगरसेवक रामनाथ बंग, नवनाथराव चव्हाणमुंकुंद गर्जे, राजेंद्र कोटकर,नंदकुमार डाळिंबकर,शिवनाथ आंधळे, नवनाथराव वाघ, आसाराम ससे, नवनाथराव उगलमुगले, भाऊसाहेब निमसे, योगेश रासणे, आनंद सानप, शायदभाई पठाण, नागनाथ गर्जे, आतिष निह्राळी, किशोर गाडेकर,संदेश बाहेती,मंगेश राठोड, आजिनाथ ढाकणे, सतिष वारंगुळे, महेश दौंड, संतोष आंधळेरवी पालवे, सुनील दौंड, विकास दिनकर, बाळासाहेब केंदळे, राहूल ढाकणे, अनिकेत निगुरकर,पप्पू बनसोड, भूषण नागापुरे, सुखदेव मर्दाने, सनी आठरे, राहूल पानखडे, अरुण पानसंबळ आदी उपस्थित होते,जनकल्याण रक्त पेढी नगर यांनी तसेच जनकल्याण चे डाँ.जी.स.गुप्ता, डाँ. विलास मढीकर  यांनी या रक्तदान शिबिरासाठी सर्व वैद्यकीय सुविधा पुरवली. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षक सेना तालुकाप्रमुख नंदकुमार डाळिंबकर सर व आभार सुरेश हुलजुते यांनी मानले.

Post a Comment

0 Comments