वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामास हिरवा कंदील


करंजी - पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागास वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामास वनविभागाने आज परवानगी दिल्याने वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामास लवकरच सुरुवात होईल अशी माहिती माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी दिली.

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगराच्याकडेची अनेक गावे वांबोरी चारीपासुन वंचित होती.अनेक दिवसापासुन या भागातील शेतकऱ्यांची वांबोरी चारी टप्पा दोनची मागणी होती. या योजनेस प्रशासकीय मंजुरीही मिळाली होती. वांबोरी चारी टप्पा दोन करता वन विभागाची मंजुरी मिळविण्यासाठी संभाजीराव पालवे व स्व. मोहनराव पालवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. हा विषय पाथर्डी तालुक्याच्या पश्चिमेच्या दुष्काळी भागासाठी खूप महत्त्वाचा होता .त्यावर सातत्याने प्रशासनाचा पाठपुरावा करत करत २०१२ साली त्याला प्रथमता तत्वतः मंजुरी मिळाली. योजनेचा पाठपुरावा करीत असताना अनेक आडचणी आल्या त्या प्रत्येक आडचणीवर मात करत हा टप्पा दोन मंजूर झाला.सुप्रमा ७ शेवटच्या टप्प्यात मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर असून लवकरच त्यालाही परवानगी मिळेल. या योजनेसाठी १५० एमसीएफटी पाणी लागणार असून १५० एमसीएफटी पाणी आरक्षित आहे आणि त्यामधून या १२ गावाच्या ३२ तलावासाठी पाणी पाईपलाईनद्वारे पोहोचवण्याचे नियोजन शासनाने केलेला आहे. योजना चालू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पश्चिम भागाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे संभाजीराव पालवे यांनी यावेळी सांगितले.

दिनांक  ९/१२/ २०१९ रोजी या योजनेकरता टेंडर करण्याची परवानगी मिळाली.परंतु अधिकाऱ्यांनी वन विभागाची अट घातली होती. वनविभागातून राहुरी तालुक्यातील वरवंडी आणि बाभळगाव या गावच्या हद्दीतून तर नगर तालुक्यातील चिंचोली गावच्या वनक्षेत्रातून ही पाईपलाईन जात होती. वरवंडी येथील गट नंबर १४३ मधून ११३५ मीटर लांब तर बाभळगाव येथीन ३० /२ गटनंबर मधून २७९ लांबीची पाईपलाईन जाणार असून त्याकरिता त्याकरिता ५६ गुंठे जमीन तसेच नगर तालुक्यातील जिथे डिस्चार्ज टाकी होणार तेथे १९ आर. जमीन लागणार आहे. वनविभागाच्या उप वनसंरक्षक अधिकारी माने मॅडम यांनी २२/११/२०२२ रोजी परवानगी दिली.याकरिता कार्यकारी उपवनसंरक्षक माने मॅडम तसेच वन विभागाचे अशोक भवरे मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता मासाळ उपअभियंता शिंदे मॅडम पुंड, मजले चिंचोलीचे सरपंच अमितराव आव्हाड वरवंडीचे सरपंच भाऊसाहेब कोळेकर, बाभळगावचे सरपंच गोरक्ष गिरे यांनी सहकार्य केले. तसेच या योजनेसाठी माजीमंत्री जयंत पाटील, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी विषेश प्रयत्न करुन हा प्रश्न मार्गी लावल्याचे संभाजीराव पालवे यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments