लोहसरला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार

महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणारा गाव व वनक्षेत्रातील वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा मानाच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस लोहसर ग्रामपंचायतीला जाहिर झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी गाव व गावाच्या वनक्षेत्रातील वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाच्या भरीव कामाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देण्यात येत असतात. या मानाच्या २०१८/१९ सालाच्या पुरस्काराची आज घोषणा होवुन पाथर्डी तालुक्यातील "ग्रीन व्हिलेज" म्हणुन ओळख असलेल्या लोहसर ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला तर नाशिक विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळाला असल्याची माहिती लोहसरच्या सरपंच सौ.हिराताई गिते यांनी दिली. राज्यातील तृतीय क्रमांकाचे ५० हजार रुपयांचे बक्षीस तर नाशिक विभागातील प्रथम क्रमांकाचे ५० हजारांचे बक्षीस लोहसर ग्रामपंचायतीला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारंभपूर्वक हा पुरस्कार मिळणार आहे. लोहसर ग्रामपंचायत ही अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम वनश्री ग्रामपंचायत हा बहुमान मिळविणारी ग्रामपंचायत ठरली आहे. 

पाथर्डी तालुक्यातील लोहसर ग्रामपंचायतने यापूर्वीही वृक्ष स्मृती लागवड तसेच यासारख्या वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाच्या अनेक योजना राबविलेल्या असुन त्या राज्यात आदर्श ठरलेल्या आहेत. या मानाच्या पुरस्काराने लोहसरच्या वैभवात भर पडली आहे.सौ.हिराताई गिते सरपंच लोहसर यांनी सांगितले की ग्रामपंचायतीला शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारात तृतीय क्रमांक मिळाला आहे तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळाल्याने लोहसरच्या वैभवात भर पडली आहे.

Post a Comment

0 Comments