क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जय-पराजय पचवण्याची ताकद - वैभव शेवाळे

 

पाथर्डी – शालेय जीवनात विविध क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला सकारात्मक आकार निर्माण होतो.विद्यार्थ्यांमध्ये जय पराजय पचवण्याची शक्ती निर्माण होते.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते तसेच यास स्पर्धांसाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळ या संस्थेने मैदान व सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा परिपूर्ण फायदा घ्यावा असे आवाहन करून सुवर्ण तरुण मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे यांनी स्पर्धेतील खेळाडूंना मार्गदर्शन केले.

जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित पाथर्डी तालुकास्तरीय शालेय खो-खो (मुले) या क्रीडा स्पर्धा पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे श्री विवेकानंद विद्यामंदिर व बाबुजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी येथील क्रीडांगणावर उत्साहात संपन्न झाल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अहमदनगर जिल्हा कार्यालयांच्या वतीने घेण्यात येत आहेत या स्पर्धेसाठी खेळाडूमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो मुले या स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगट १२ संघ,१७ वर्षे वयोगट १६ संघ, १९ वर्षे वयोगट संघांनी सहभाग घेतला.

त्याचबरोबर पाथर्डी शहरातील प्रशांत शेळके,नितीन एडके, अमोल सोनटक्के,आजिनाथ डोमकावळे, माजी नगरसेवक प्रसाद आव्हाड, अभियंते शेख शाहरुख, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, मुख्याध्यापक शरद मेढे,मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, क्रीडा शिक्षक शशिकांत निराळी उपस्थित होते.क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी करणाऱ्या सर्व पंचांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी व आभार शरद मेढे यांनी मानले तर सूत्रसंचालन रावसाहेब मोरकर यांनी केले.क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडा समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिरसाट,सतीश डोळे, रावसाहेब मोरकर, प्रमोद हंडाळ, सचिन शिरसाट, अजय भंडारी, छबुराव फुंदे, सूर्यभान दहिफळे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments