पाथर्डी तालुक्यातील करोडी येथे दि. १७/११/२०२२ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत अवैध रित्या जुगार खेळणाऱ्या ६ आरोपी कडून ४ लाख ३२ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
करोडी गावचे शिवारात इसम नामे सुनिल गोपीनाथ वारे याचे शेताचे कडेला असलेल्या शेडच्या पाठिमागे पाच ते सहा
इसम तीन पत्त्याचा हारजितीचा जुगार खेळतात आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर
बातमी मिळाल्याने पोनि. सुहास चव्हाण सो. सपोनि. पाटील सो. पोकॉ भगवान सानप, पोकॉ अतुल शेळके, पोकॉ बेरड, पोकॉपालवे, पो.कॉ.देविदास
तांदळे यांच्या पथकाने पंचां समक्ष करोडी येथे दि. १७/११/२०२२ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास छापा टाकुन आरोपी १) सुनिल नवनाथ शिररसाटरा.पिंपळगाव टप्पा
२) विष्णु सुखदेव दहिफळे ३) बळीराम विष्णु
दहिफळे रा.महिंदा ता.आष्टी जि.बीड ४) विष्णु भगवान चिंतामणी रा.
विजयनगर, पाथर्डी ५) सुनिल गोपीनाथ वारे रा.करोडी
ता.पाथर्डी जि.अहमदनगर ६) अशोक भगवान दहिफळे रा. महिंदा ता. आष्टी जि.बीड यांना ताब्यात घेवून आरोपीची अंगझडती व जागेची झडती घेतली असता त्यांचे कब्जात तीन पत्याचा हारजितीचा जुगाराचे
साहित्य, रोख रक्कम, मोबाईल, मोटार कुलर, इन्वर्टर यांचे विरुध्द मुंबई जुगार
कायदा कलम १२(अ) प्रमाणे फिर्याद दाखल
करण्यात आली आहे.
0 Comments