संगमनेर –
तालुक्यातील आश्वी खुर्द येथील मोठे बाबा परिसरात गुरुवारी मध्यरात्री बिबट्याने
ऊस तोडणी कामगाराच्या झोपलेल्या अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला करत त्यास जंगलात
ओढून नेहल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
आश्वी खुर्द
परिसरात उसतोड कामगारांचा रहिवास ठिकाण असून उसतोड कामगार उसाच्या पाचट,लाकडा पासून
बनवलेल्या झोपड्यात (कोप्यात) राहतात. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलगा विरू अजय पवार वय ३ हा त्याचे व वडील
अजय पवार तसेच आई समवेत कोपीत झोपलेला होता, अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने झोपलेल्या
लहान मुलांवर झडप घातली व मुलाला फरपटत जवळच असलेल्या शेतात ओढत नेहले त्यावेळी
मुलांनी आरडाओरडा केल्याने झोपलेल्या आई - वडिलांना जाग आली व त्यांनी व
आजूबाजूच्या ऊस तोडणी कामगारानी हिकमतीने त्या मुलाला बिबट्याच्या तावडीतून सोडवले
व उपचारासाठी संगमनेर येथे दवाखान्यात दाखल केले असून चिमुकल्याची प्रकृती
चिंताजनक आहे.
0 Comments