कायदेविषयक हक्क आणि अधिकार अंगीकारण्याची गरज - न्यायाधीश व्ही.आय.शेख

पाथर्डी - समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना कायदा व कायदेशीर हक्क आणि अधिकार यांची माहिती झाली पाहिजे,कायदा,हक्क आणि अधिकार प्रत्येकाने अंगिकारले तर गुन्ह्यांचे प्रमाण निश्चितच कमी होण्यास मदत होईल, आणि याच उद्देशाने कायदे विषयक जनजागृती केली जात आहे असे आवाहन पाथर्डी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.आय.शेख  यांनी केले.

पाथर्डी तालुका विधी सेवा समिती आणि पाथर्डी वकील संघाच्या वतीने आजादिका अमृत महोत्सव निमित्त पाथर्डी तालुक्यात दिनांक ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत "हक हमारा भी है" या मोहिमे अंतर्गत पाथर्डी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या तुरुंगातील कैदयासाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.यावेळी कैद्यांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश व्ही आय.शेख बोलत होते. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.राजेंद्र खेडकर व अॅड.आंबदास खेडकर यांनी बंदिवासात असलेल्या कैद्यांना त्यांचे हक्क व अधिकारा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार पाथर्डी येथे विविध गुन्ह्याच्या तपासा साठी बंदीवासात असणाऱ्या कैदयाकडून कायदेशीर हक्क व अधिकार याबाबत कैद्या कडून माहिती संकलित करण्यात आली.यावेळी वकील संघाचे अॅड.आय्याज शेख,अॅड.हरिहर गर्जे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ,पोलीस उपनिरीक्षक सचिन लीमकर,पोलीस हवालदार दादू गायकवाड,दादासाहेब बोरुडे,तुरुंग अधिक्षक रेरा एंबारे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्र संचलन अॅड.नितीन वायभासे यांनी तर न्यायालयीन कर्मचारी गणेश दानवे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments