राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर आ.राजळे यांची निवड

पाथर्डी - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी च्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून आमदार मोनिका राजळे यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांनी निवड केली आहे.

आ.राजळे यांना राहुरी कृषी विद्यापीठाच्या सिनेट मेंबर म्हणून निवड झाल्याचे पत्र आज प्राप्त झाले असून कृषी विद्यापीठाच्या सिनेट मेंबर म्हणून निवड केल्याबद्दल आ.राजळे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. 

कृषी विद्यापीठाच्या सिनेट मेंबर पदावर काम करतांना कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधननवीन कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांदापर्यंत नेवून शेती उत्पादनात गुणवत्ता व वाढ होण्याच्या दृष्टीने चांगले काम करणार असल्याचे तसेच ही निवड माझ्या शेतकरीकष्ठकरी बांधवांसाठी कल्याणकारी होण्यासाठी मी निश्चीत काम करील असे आ.राजळे यांनी सांगितले.माजी आमदार स्व. राजीव राजळे यांची सुध्दा राहुरी कृषी विद्यापीठाचे सिनेट मेंबर म्हणून नियुक्ती यापूर्वी झाली होती. आज त्याची पुनरावृत्ती होवून विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून मोनिका राजळे राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करणार आहेत.

 

Post a Comment

0 Comments