शेवगाव
– मंगळवारी शेवगाव शहरामध्ये लहान मुलांनी एकत्र येवून तालुक्यातील
व शहरातील रस्त्या संदर्भात प्रातिनिधिक स्वरूपात गाडगे बाबा चौक येथे रस्त्यावरील
खड्ड्याला कार्यसाम्राट खासदार खड्डा,
व कार्यसम्राट आमदार खड्डा अशी नावे
देवून शेवगाव शहरातील खड्डे मुक्त रस्ता त्वरित करा अश्या आर्त हाका चिमुकल्यांनी दिल्या.
खड्डे
बुजवू नका तर शेवगाव शहरातील व तालुक्यातील सर्व रस्ते
तयार करा अशी घोषणाबाजी चिमुकल्यांनी केली. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे
राज्य कौन्सिल सदस्य कॉ.संजय नांगरे व त्यांची तीन वर्षाची मुलगी गौतमी नांगरे
हिच्यासह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले प्रतिबंधात्मक कार्यवाही करून सोडून दिले.
शेवगाव शहरातील व तालुक्यातील रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेला नागरिक कंटाळले
असून शाळकरी चिमुकल्यांनी आंदोलन करून आमदार,
खासदारांनी रस्ते करावेत. मंगच मतदार
संघात फिरावे अशा पद्धतीच्या घोषणा चिमुकल्यांच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी
गौतमी नांगरे, युवराज दुसंग, शैलेश तिजोरे, आरव
तिजोरे, सुयेश मगर, साई केमसे, श्रद्धा
केमसे, राजनंदिनी फुंदे,
यश फुंदे,
अमन विश्वकर्मा, पूजा
विश्वकर्मा, काजल विश्वकर्मा,
सुरज नांगरे, गौरव
नांगरे, साईराज नांगरे,
राज वरे,
सायली वरे, कॉ.अड.सुभाष
लांडे, राम लांडे, बाबूलाल सय्यद, क्रांती
मगर, शेखर तिजोरे, राजेंद्र दुसंग, प्रेम
अंधारे, शरद म्हस्के, प्रीतम नाईक, सुनील
आहुजा आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारतीय कम्युनिस्ट पक्ष कॉ.संजय
नांगरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन
झाले.
0 Comments