बाबूजी आव्हाड महाविद्यालयात संविधान दिन साजरा

पाथर्डी - संविधान दिनाचे औचित्य साधून बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी सविधान उद्देशिकाचे वाचन व संविधानाचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी पी ढाकणे यांनी संविधानाचे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची असून संविधानामुळे सामान्य व्यक्तीला स्वातंत्र्य,समता, बंधुत्व या मूल्याची ओळख झाली तसेच धर्मनिरपेक्ष समाजवाद लोकशाही गणराज्याची प्रस्थापना झाली असे प्राचार्य ढाकणे यांनी सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अरुण राख यांनी तर आभार डॉ.सुभाष शेकडे यांनी केले,याप्रसंगी डॉ बी.ए.चौरे, डॉ.अशोक डोळस प्रा.आनंद घोंगडे,डॉ अभिमन्यू ढोरमारे, प्रा.डी.डी.पालवे,डॉ.अर्जून केरकल, डॉ.भगवान सांगळे,डॉ.ए.एम.पालवे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments