करंजी - सराफाचा व्यवसाय करणारे सराफ सतिष दिक्षित यांना नगर-पाथर्डी
महामार्गावरील निंबोडी फाट्यानजीक अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना काल सायंकाळी
६ वाजण्याच्या सुमारास घडली असून याबाबत अद्यापि गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पाथर्डीचे रहिवाशी
असलेले परंतु आपले सोन्या-चांदीचा करंजीत व्यवसाय करणारे सराफ सतिष दिक्षित यांचे
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. ते दररोज आपल्या स्कुटी
गाडीवरून पाथर्डीवरुन सकाळीच करंजीला येत असतात व सायंकाळी ६ वाजता वाजता पाथर्डीला
जातात. आज सायंकाळी ६ वाजता ते करंजीवरुन पाथर्डीला जाण्यासाठी निघाले होते.
नगर-पाथर्डी महामार्गावरील निंबोडी फाट्याजवळ मागुन पल्सर गाडीवर आलेल्या दोघा
जणांनी त्यांना गाडी आडवी लावुन अडविले आणि त्यांच्याजवळील स्कुटी घेवुन पळुन जात
असताना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संघटक व सराफ मंगलताई म्हस्के या तिसगाववरुन
आपल्या चारचाकी गाडीत येत असताना त्यांच्यासमोर हा प्रकार घडत होता. त्यांनी थोडा
आरडा-ओरड करताच जवळच हॉटेलवर असलेले रवि भापसे मदतीसाठी पळत आले पण चोरट्यांनी
स्कुटी घेवुन पळ काढला. रवि भापसे यांनी सराफ सतिष दिक्षीत यांना आपल्या
मोटारसायकलवर बसवुन चोरट्यांचा पाठलाग केला पण स्कुटी सोडुन चोरटे पसार झाले. स्कुटीच्या
डिकीची मोठ्या प्रमाणात मोडतोड केलेली होती पण त्यातील किती ऐवज गेला याबाबतची
माहिती मिळु शकली नाही.सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांवर व सराफावर होत
असलेल्या हल्ल्याच्या प्रमाणात दिवसे-दिवस वाढ होत असुन पोलिस मात्र बघ्याची
भुमिका घेत असल्याचा आरोप मंगलताई म्हस्के सराफ यांनी केला असुन सराफावर झालेल्या
एकाही हल्ल्याचा तपास पोलिसांनी लावला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या
हल्ल्यातील गुन्हेगारास त्वरीत अटक न केल्यास आपण लवकरच तिव्र आंदोलन करणार
असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments