पाथर्डी तालुक्यातील
मिरी ग्रामपंचायतीच्या वतीने २१ मागासवर्गीय महिलांना शिलाई मशिन तसेच पिठाच्या
गिरण्या व ९ दिव्यांगाना सानुग्रह अनुदान वाटपाच्या कार्यक्रमात डाॅ. पालवे प्रमुख
पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ झाडे होते.
जगदिश पालवे पुढे म्हणाले,समाजातील गोर-गरिबासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत.पण दुर्दैवाने त्याला लाभ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत नाही. शासनाच्या या सर्व योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत व कार्यकर्त्यांनी जागृत राहुन काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मिरी ग्रामपंचायतीच्यावतीने २१ मागासवर्गीय महिलांना रोजगारासाठी शिलाई मशिन व पिठाच्या गिरण्या तसेच ९ दिव्यांच्या सानुग्रह अनुदानाचे वाटप यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत मिरीच्या कु. वैशाली झाडे व सैन्यात निवड झाल्याबद्दल आकाश गुंड यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास पंचायत समितीचे सदस्य राहुल गवळी, सरपंच सौ. सुनंदा गवळी, उपसरपंच संजय शिंदे,ग्रा.पं. सदस्य विजय गुंड, जालिंदर गवळी, संभाजी झाडे, सुभाष गवळी,अदिनाथ सोलाट, विकास मिरपगार, अदिनाथ झाडे,तसेच सेवा संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गवळी, संचालक जगन्नाथ वेताळ, तज्ञ संचालक राजेंद्र गवळी तसेच अशोक गवळी,बापु मिरपगार,भाऊ पाटोळे, गोरख पाटील, बंडु झाडे,रघुनाथ गुंड, मच्छिंद्र दारकुंडे, रावसाहेब शेळके,विजय गवळी, ग्रामसेवक राजेंद्र साखरे, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचाऱ्यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.यावेळी जालिंदर गवळी,भाऊ पाटोळे,वैशाली झाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्ताविक सुभाष गवळी यांनी केले.
0 Comments