वादाने अधोगती; सु-संवादाने प्रगती – न्यायमूर्ती ए.एस.बिराजदार

पाथर्डी – समाजाची वादाने अधोगती होते तर संवादाने प्रगती साधली जाते, नागरिकांचे हक्क आणि अधिकारांची जपवणूक करण्यासाठी आपसात सु-संवाद ठेवला पाहिजे, आपसात होणारे वाद प्राथमिक स्थरावच मिटवले गेले पाहिजेत,प्रत्येकाला कायद्याचे मुलभूत ज्ञान असले तर गुन्हेगारी मुक्त समाज हि संकल्पना प्रत्यक्षात अंमलात येईल असे मत पाथर्डी न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती ए.एस.बीराजदार यांनी व्यक्त केले.

पाथर्डी तालुका विधी सेवा समिती आणि पाथर्डी वकील संघाच्या वतीने आजादिका अमृत महोत्सव निमित्त पाथर्डी तालुक्यात दिनांक ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या कायदेविषयक जनजागृती मोहिमे दरम्यान सोमवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश श्रीमती ए.एस.बिराजदार बोलत होत्या. यावेळी श्रीमती ए.एस.बिराजदार यांनी ग्रामस्थांना महिलांचे कौटुंबिक छळ,अत्याचार थांबवण्या बाबत कायदेविषयक सविस्तर मार्गदर्शन केले,भारतीय संस्कृती मध्ये स्त्रीला देवीचे रूप मानले जाते तिला सन्मान मिळणे आवश्यक असून स्त्री ला कुटुंबात कायदेशीर समान हक्क व अधिकार मिळाले तर कुटुंबाची व समाजाची अपेक्षित प्रगती साधली जाईल असे सांगितले असे बिराजदार यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.राजेंद्र खेडकर यांनी जेष्ठ नागरिकांच्या हक्क व अधिकारा बाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, यावेळी वकील संघाचे अॅड.आयाय्ज शेख,नितीन वायभासे,अॅड.निलेश दातार,अॅड.हरिहर गर्जे,न्यायालयीन कर्मचारी गणेश दानवे,राजेंद्र वायकर,ग्रामसेवक चांगदेव तळेकर,सरपंच रणजीत बांगर,संपत गर्जे,कल्याण पौंधे,विलास बांगर,नवनाथ साप्ते,उत्तम बांगर,राजेंद्र पौंधे,लहू गोसावी,तुकाराम साप्ते,ग्रामपंचायत कर्मचारी पप्पू वाघ,भुजंग साठे यांच्या सह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॅड.हरिहर गर्जे यांनी तर सरपंच रणजीत बांगर यांनी आभार मानले. 


Post a Comment

0 Comments