पाथर्डी ग्रामसेवक संघटनेकडून लंम्पी सेंटरला मदत


पाथर्डी - देशातील पहिल्या बळीराजा लंपी क्वारंटाईन जनावरांच्या तिसगाव येथील छांवणीला ग्रामसेवक संवर्ग पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडुन चारा व पशुखाद्य इत्यादींची मदत करण्यात आली.

शरद मरकड व त्यांच्या सहकार्याच्या संकल्पनेतून जनावरांच्या लंपी आजारावरील उपचारासाठी तिसगाव येथे विना शासकिय मदत घेता छांवनी सुरु करण्यात आली असून छावणीत मोठ्या संखेने जनावरांची आवक सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी चारा तसेच आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे ओळखून मदत करण्यात येत आहे. यावेळी बळीराजा लंपी सेंटरला दोन बँग मुरघास तसेच दहा हजार रुपये किमतीचे सरकी पेंड आणि वालीस अशी एकुन २५००० रुपयांची चाऱ्यासाठी मदत करण्यात आली यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने सर्व पशुपालकांना अल्पोपहार देण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी जगदीश पालवे, विस्तार अधिकारी मल्हारी इसारवाडे,  ग्रामसेवक राजेंद्र ढाळे, राजळे भाऊसाहेब,सुरेंद्र बर्डे,पातकळ भाऊसाहेब,सुबोध आव्हाड,अमोल भवार,आकाश पवार,गिरीश उगार आदी सह ग्रामसेवक उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments