ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत दया !


पाथर्डी - अति पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने १३००० रुपये तुटपुंजी मदत जाहीर केल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र घोषणाबाजी देऊन निषेध करण्यात आला. तसेच महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना किमान ५० हजार रुपये हेक्टरी मदत शासनाने द्यावी असे निवेदन नायब तहसीलदाराना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, समवेत उपजिल्हाप्रमुख रावजी नागरे, तालुकाप्रमुख भगवान दराडे , संघटक राजेंद्र म्हस्के, भाऊसाहेब धस ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, चाॅद मणियार ,देवा पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, आतिष निराळी यांनी दिले.

Post a Comment

0 Comments