प्रा.सारिका थोरात यांना पीएच.डी प्रदान

शेवगाव - प्रा.सौ.सारिका राजेंद्र थोरात (रा.वरुर खुर्द,ता.शेवगाव) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी नुकतीच प्रदान करण्यात आली.त्या पुणे येथील एच.व्ही.देसाई महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापक म्हणून सेवेत आहेत. त्यांनी ' अश्विनी धोंगडे यांची साहित्यसृष्टी आणि जीवनदृष्टी ' हा प्रबंध सादर केला होता.त्यांना प्राचार्य डॉ.शोभा इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा.थोरात प्रतिभावंत साहित्यिक असून त्यांची ' तिर्थोदक ' ही चरित्रात्मक कादंबरी ' गुलमोहर ' 'निवडुंग' हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.त्या भोसरी (पुणे) येथील बालाजी इंजिनिअरिंग कार्पोरेशनचे संचालक राजेंद्र थोरात यांच्या धर्मपत्नी तर,निवृत्त माध्यमिक शिक्षक दिनकर वावरे यांच्या सुकन्या आहेत.पीएच.डी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments