पाथर्डी पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत संदिप गिते ( वय ३८ वर्ष) रा. लोहसर, ता. पाथर्डी यांनी म्हटले आहे की, मि व माझा चुलत भाऊ देवेंद्र गिते आम्ही दोघे आमच्या मोटारसायकलवरून लोहसर गावातुन आम्ही रहात असलेल्या वस्तीवर चाललो असता, अनिल गिते यांच्या शेताजवळील कंपाऊंडजवळ रात्री १२-४५ वाजण्याच्या दरम्यान मागुन एका मारुती इको गाडीमधुन सलमान पठाण,नदिम पठाण, ऋषीकेश लगड रा. करंजी व ओमकार वांढेकर रा. खांडगाव आले. त्यांनी आमच्या मोटारसायकला गाडी आडवी लावुन दमदाटी व मारहाण करुन माझ्याजवळील २० हजार रुपये व माझा चुलत भाऊ देवेंद्र याच्याजवळील ३८ हजार रुपये काढुन घेतले. यासंबंधी पाथर्डी पोलिस स्टेशनला गु. र. नं. १०६१/२०२२ भा. द. वि. ३२७,३४१,३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्ह्याचा तपास पो.नि.सुहास चव्हाण, पो.हे.काॅ. अरविंद चव्हाण करीत आहेत.यापुर्वीही करंजी घाट व परिसरात अशा प्रकारचे लुटमारीचे अनेक गुन्हे घडलेले आहेत. या घटनेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता परिसरातील नागरिकातुन व्यक्त केली जात आहे.
0 Comments