पाथर्डी – नगरपरीषदे मार्फत शासनाच्या वतीने पालिका हद्दीतील
दिव्यांगाना देण्यात येणारा निधी मिळाला नसल्याने मा.नगरसेवक रामनाथ बंग यांच्या
नेतृत्वाखाली गरूवारी दुपारी दिव्यांगानी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना निधी
देण्या बाबत निवेदन देण्यात आले.
दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत
स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांग कल्याण व पुनर्वसन यासाठी पाच
टक्के निधी राखीव ठेवून ती रक्कम दिव्यांग कल्याण कल्याणार्थ खर्च करणे
अपेक्षित आहे परंतु गेल्या वर्षभरापासून पाथर्डी पालिका क्षेत्रात सदरील पाच टक्के
रकमेची वारंवार निवेदनाद्वारे पालिका प्रशासन प्रशासनाकडे मागणी करून देखील सदरील
रक्कम दिव्यांगांना वितरित करण्यात आली नाही.
सदरील दिव्यांगासाठी राखून ठेवण्यात आलेला पाच टक्के निधी २०२१-२०२२ या आर्थिक
वर्षाचा निधी पाथर्डी पालिका क्षेत्रातील दिव्यांगांना वितरित करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक
रामनाथ बंग यांच्या नेतृत्वाखाली अशोक कर्पे,गजानन महामुनी,चंद्रकांत बेद्रे,शमा
शेख,राहुल पटवा यांनी पालिका मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना एका निवेदनाद्वारे
दिले आहे.माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी यावेळी सांगितले कि अपंग दिनाच्या आधी हा
निधी अपंगाना मिळावा अन्यथा याबाबत मोठे जनआंदोलन केले जाईल.
0 Comments