शेवगाव - धाकटी पंढरी असा
सर्वदूर लौकिक असलेल्या श्रीक्षेत्र वरुर,
(ता.शेवगाव) येथील पुरातन स्वयंभू
श्रीविठ्ठल - रुक्मिणी मंदिराच्या शिखर व कळस जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ गुरुवारी
(दिं.२४ रोजी) ब्रम्हवृदांच्या मंत्रघोषात शास्त्रोक्त कलाकर्षण (कर्म व संस्कार)
विधीने मंगलमय वातावरणात करण्यात आला.
या कार्यक्रमास
ग्रामस्थ - भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे ३५० वर्षाचा वारसा या देवस्थानला लाभला असून मंदिरातील
श्री विठ्ठल - रुक्मिणीच्या वालुकाय मूर्ती स्वयंभू असल्याने या स्थानाला वारकरी
सांप्रदायात अनन्य साधारण महत्त्व आहे.सुमारे ३५ लाख रुपये खर्चाच्या नूतन शिखर व
कळस कामासाठी सर्वश्री आबासाहेब खांबट गुरुजी,
नानासाहेब वावरे गुरुजी व निलेश मोरे
यांचे अधिपत्याखाली स्थानिक २१ सदस्यांची श्रीविठ्ठल - रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार
समिती स्थापन करण्यात आली आहे. निधी संकलनास ग्रामस्थांचा चांगला
प्रतिसाद मिळत आहे.
देवस्थानचे अध्यक्ष
तथा प्रसिद्ध भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले यांच्या मार्गदर्शनाखाली वे.शा.सं.
नारायणदेवा सुलाखे (बीड) व वे..शा.स. संजूदेवा मुळे (शेवगाव) तसेच वेदमूर्ती
गौरवदेवा मुळे (शेवगाव) अशोकगुरु भुसारी (पैठण) व गौरवगुरु देवळे (गंगापूर)आदी
ब्रह्मवृदांच्या मंत्रघोषात कलाकर्षण विधी पार पडले.५१ लक्ष्मी - नारायण
जोडप्यांकरवी हे विधी करून घेण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार
समिती वरूर यांच्या वतीने मंदिर जीर्नोधारा करिता खालील पत्त्यावर ऐच्छिक देणगी पाठवण्याचे
आवाहन करण्यात आले आहे.Branch -Varur BK,Account number : 60420141516,IFSC code : MAHB 0000903
0 Comments