मिरी - पांढरीपुल ते करंजी या रस्त्याचे काम
खोसपुरीपासुन सुरु झाले आहे, मात्र हे काम
निकृष्ट होत असल्याचे लक्षात येताच पाथर्डी समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे
आणि या भागातील लोकांनी हे काम बंद करुन संबंधित ठेकेदारास हे काम पुन्हा उकरुन
दुरुस्त करण्यास भाग पाडले.
पाथर्डी तालुक्यातील पांढरीपुल ते करंजी या अतिशय महत्वाच्या रस्त्याची मोठी
दुर्दशा झाली होती. हा रस्ता दुरुस्त करण्यात म्हणुन या भागातील नागरिकांची अनेक
दिवसापासुनची मागणी होती. या भागातील लोकांना राहुरीमार्ग नाशिक, तसेच मनमाड, धुळ्याकडे जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत
जवळचा असल्याने या रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण, विस्तारीकरणाच्या
कामासाठी सव्वा दोन कोटीचा निधीही मंजुर होवुन या रस्त्याच्या कामास खोसपुरीपासुन
ते शिराळ सुरुवात झाली होती, मात्र या
रस्त्याचे मापाप्रमाणे खोलीकरण तसेच मुरुमाऐवजी मातीचा वापर करण्यात येत असल्याचे
संभाजीराव पालवे व लोकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रत्यक्ष कामास भेट देवुन हा रस्ता
पुर्ण खोदाई करुन दुरुस्त करण्यास भाग पाडले. यावेळी संभाजीराव पालवे, मजले चिंचोली सरपंच अमित आव्हाड, आव्हरवाडी सरपंच अंकुश आव्हाड, माजी सरपंच भानुदास आव्हाड, वसंत लटपटे, सरपंच बाबाजी पालवे, पंढरीनाथ आव्हाड, रावसाहेब जाधव, गणेश पालवे, रामेश्वर रामा पहाड, अनिता नेटके, उदरमलचे सरपंच भिंगारदिवे. सार्वजनिक
बांधकाम विभागाचे इंजिनिअर संभाजीराव अनेक मान्यवर व या भागातील नागरिक मोठ्या
संख्येने हजर होते.
यावेळी संभाजीराव पालवे, मजले चिंचोली
सरपंच अमित आव्हाड, आव्हरवाडी सरपंच अंकुश आव्हाड, माजी सरपंच भानुदास आव्हाड, वसंत लटपटे, सरपंच बाबाजी पालवे, पंढरीनाथ आव्हाड, रावसाहेब जाधव, गणेश पालवे, रामेश्वर रामा पहाड, अनिता नेटके, उदरमलचे सरपंच भिंगारदिवे. सार्वजनिक
बांधकाम विभागाचे इंजिनिअर संभाजीराव अनेक मान्यवर व या भागातील नागरिक मोठ्या
संख्येने हजर होते.
0 Comments