कायदेशीर मदतीपासून कोणीही वंचित राहू नये - न्यायाधीश व्ही.आय.शेख

 

पाथर्डी – कायदेशीर हक्क आणि अधिकारांची बजावणी करताना गरीब श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही, न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तसेच कायदेशीर मदती पासून कोणीही वंचित राहू नये यासाठी राज्य घटनेतील तरतुदी नुसार दुर्बल घटकांना न्यायालयात मोफत कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मोफत वकील पुरवले जातात असे आवाहन पाथर्डी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. आय. शेख यांनी केले.

पाथर्डी तालुका विधी सेवा समिती आणि पाथर्डी वकील संघाच्या वतीने शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी पाथर्डी तालुक्यातील वाळूंज येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले त्यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश व्ही.आय.शेख बोलत होते होते. यावेळी वाळूंजचे सरपंच विठ्ठल शेळके,वकील संघाचे अध्यक्ष अॅड.राजेंद्र खेडकर,अॅड.अमोल पालवे, अॅड.आंबादास खेडकर, अॅड.अय्याज शेख, अॅड.आत्माराम वांढेकर, अॅड.निलेश दातार तसेच न्यायालयीन कर्मचारी गणेश दानवे,ग्रामसेविका पाठक यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॅड.नितीन वायभासे यांनी तर अॅड.सतीश शेळके यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments