जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेता येते – न्यायाधीश व्ही.आय.शेख

पाथर्डी विद्यार्थी दशेत जिद्द आणि चिकाटी असेल तर प्रतीकुल परिस्थिती मध्ये देखील शिक्षण घेता येते, शिक्षण घेण्यासाठी पैसा हा दुय्यम असून जिद्द व चिकाटी असेल तर शिक्षणाची द्ववारे आपण उघडू शकतो,आर्थिक परिस्थिती बिकट आहे म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही,भारतीय राज्य घटनेने प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क दिलेला आहे, चांगले ध्येय घेवून शिक्षण प्राप्ती साठी मार्गक्रमण करा असे आवाहन पाथर्डी दिवानी न्यायालयाचे  न्यायाधीश व्ही.आय. शेख यांनी केले.

पाथर्डी तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथर्डी शहरातील नाथनगर येथील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.यावेळी पाथर्डी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.आय शेख विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना बोलत होते.


या शिबिरासाठी पाथर्डी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर.एन. खेडकर, अॅड. निलेश दातार,अॅड. अय्याज शेख,अॅड. अंबादास खेडकर,अॅड. नितीन वायभासे यांच्या सह न्यायालयीन कर्मचारी गणेश दानवे,श्रीमती तोगे आदी सह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. वायभासे यांनी केले तर आभारप्रदर्शन अॅड.यु.के.खेडकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments