प्रा.किसन चव्हाण यांचा दणका,बांधकाम विभागाचा ढिला झाला मणका !

शेवगाव - तालुक्यातील खड्डे डांबराने न भरल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देताच रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात झाल्याने वंचित बहूजणच्या वतीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

शेवगाव तालुक्यातील रस्त्यावरचे खड्डे डांबराणे न भरल्यास अधिकार्यांच्या तोंडाला  काळे फासणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी दिला होता तसे निवेदनही देण्यात आले होते, आज सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या अनुसरून लेखी पत्र देवून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे या करिता वंचित बहुजन आघाडीने आंदोलन करु नये असे पत्र तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख यांना दिले या पत्रास अनुसरुन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी शेवगाव शहर व तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना बैठकीत सुचना देवून सांगितले की आपल्या निवेदनात दिलेल्या इशार्याने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे तरी हे आंदोलन थांबवण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने वंचितच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन खड्डे बुजन्यास सुरुवात केल्याने गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता शेवगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्या ऐवजी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग शेवगावचे उप अभियंता प्रल्हाद पाठक,होके साहेब, सुरेश घुले (तात्या) , सचिन देशमुख, संजय डांगे, विजय कर्डीले,लखन घोडेराव, साळवे,गोर्डे या अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान पुर्वक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, नितीन मगर,जावेद कामयाब,बरवे मामा मुंगीचे सामाजिक कार्यकर्ते शेख नबीभाई, शेख राजूभाई, शेख सलीम जिलाणी,व ईतर सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 


Post a Comment

0 Comments