करंजी - सकाळीच दुध घेवुन नगरला चाललेल्या करंजीच्या सुभाष अकोलकर या दुधव्यावसाईक शेतकऱ्याचा ट्रकबरोबर चांद बीबी महाला जवळील सारोळा फाट्यावर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
करंजी येथील सुभाष बाबासाहेब अकोलकर (वय ४५ वर्ष) हे आपले म्हशीचे दुध घेवुन सकाळी नगरकडे जात असताना सकाळी १० वाजता नगर-पाथर्डी महामार्गावरील महालाजवळील सारोळा फाट्यावर ट्रकबरोबर समोरासमोर झालेल्या अपघातात जागीच ठार झाले. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेले असताना व कुटुंबाची सगळी जबाबदारी सांभाळुन अतिशय प्रामाणिक व मेहनतीने सुभाष अकोलकर यांनी आपला दुधाचा धंदा जोपासला व वाढविला होता.
सकाळीच म्हशीचे दुध करंजीत वाटुन
तो नगर व भिंगार येथे दुधाची विक्री करीत असे.त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात
हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
त्याच्या मागे पत्नी, आई, एक भाऊ, एक मुलगा व एक
मुलगी असा परिवार असून मयत सुभाष यांच्यावर आज दुपारी ३ वाजता करंजी येथील
अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी परिसरातील
अनेक मान्यवर, व्यापारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने
हजर होते.
0 Comments