पाथर्डी - महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत प्रशिक्षण, कृषी सहली, विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा
जीवनस्तर उंचाविण्यासाठी प्रयत्नशील आहोत
पाथर्डी शेवगाव
तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठातील संशोधनाचा उपयोग
व्हावा यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार असे प्रतीपादन शेवगाव-पाथर्डी
विधानसभेच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
बाबुजी आव्हाड महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या
कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून नियुक्ती
झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभप्रसंगी राजळे
बोलत होत्या.व्यासपीठावर
पाथर्डी नगरपालिकेचे मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड, मृत्युंजय गर्जे, नंदुशेठ शेळके, राजूशेठ गुगळे, बंडूशेठ बोरुडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश मंत्री, प्राचार्य डॉ जी पी ढाकणे, बजरंग घोडके, महेश बोरुडे,विवेक देशमुख, डॉ रमेश हंडाळ, बबन सबलस, डॉ पांडुरंग हंडाळ, ज्ञानेश्वर कोकाटे, डॉ नितीन खेडकर, किशोरशेठ परदेसी, संदीप काकडे, संदीप आव्हाड, इजाजभाई शेख, रावसाहेब हंडाळ, धनंजय चितळे, भैया नांगरे, राहुल तरवडे, आप्पा बोरुडे, दादा तळेकर, इसाकभाई चौधरी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे
प्रास्ताविक व स्वागत पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी, सुत्रसंचालन डॉ. अशोक कानडे यांनी तर
आभार प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी मानले.
0 Comments