पाथर्डी - बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचा विदयार्थी
विशाल चेमटे यांची स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या आखिल भारतीय पश्चिम
विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धेसाठी व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ,
औरंगाबाद येथे
होणाऱ्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धेसाठी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे.या
यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे
यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख व
प्रा. सचिन शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments