पाथर्डी – रेशनिंगचा तांदूळ बेकायदा काळ्या बाजारात विक्री करण्याच्या
उद्देशाने पिक अप गाडीत भरून बेकायदा वाहतूक करत असल्या बाबत पुरवठा निरीक्षक
ज्योती बबन अकोलकर यांचे फिर्यादी वरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू
अधिनियम कलम ३ व ७ प्रमाणे पिक
अप चालक आरोपी बाळकिसन दुर्गाजी देवकर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मार्केट कमिटी मैदानात दिनांक २६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता पिकप गाडी नंबर एम एच 23 डब्ल्यू 31 39 मध्ये रेशनचा तांदूळ भरलेला असल्याचे सांगत सदरील पिक अप गाडी चालकाला पूर्वी रेशनिंगचा मालाचा व्यवसाय करणाऱ्या एका इसमाने पकडून बेदम मारहाण केली होती त्याच वेळी या घटनेची माहिती येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी तलाठी हरी सानप व नायब तहसीलदार तहसीलदार मुरलीधर संपत बागुल तसेच पोलिसांना कळवून रात्रीच्या अंधारात बराच वेळ सदरील तांदुळाच्या गाडीची चौकशी केली मात्र मारहाण झाल्याने भेदरलेला पिक अप चालक त्या ठिकाणहून पळून गेला मात्र नंतर मार्केट कमिटी आवारात जमाव झाल्याने आधार सापडल्याने चालक समोर आला व त्याने सदरील मालाच्या पावत्या असल्याचे सांगत गाडी पोलीस ठाण्यात नेह्ण्याची तयारी दाखवत गाडी पोलीस ठाण्याच्या आवारात नेहून लावली. मात्र दोन दिवसाचा अवधी उलटूनही जुन्या पावत्या सादर केल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात उभा असलेल्या गाडीतील १०५०००/- रुपये किमतीचा रेशनिंगचा तांदूळ हा पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या गोण्यात भरलेला ६० गोण्या एकूण वजन अंदाजे ३५ क्विंटल तसेच ३,००००० /-रुपये किमतीचे पिकप गाडी क्रमांक एम एच २३ डब्ल्यू ३१३९ असे असलेले जुने वापरातील गाडी सह मुद्देमाल पोलिसांनी तपास कामी ताब्यात घेण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र सदरील आरोपीला कोणी व कोणत्या उद्देशाने मारहाण केली ? रेशन मालाच्या चोरावर कोण मोर होवून मलिदा खावू पाहत आहे याबाबत तालुक्यात व शहरात दोन दिवसा पासून उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.
0 Comments