मिरी - येथील जागृत देवस्थान कान्होबा उर्फ कानिफनाथ मंदिराच्या
जिर्णोद्धाराच्या कामास नाथभक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन डाॅ. बबनराव नरसाळे
यांनी मंदिर जीर्णोद्धाराचे पायाभरणी कामाच्या
शुभारंभ प्रसंगी बोलताना केले. डाॅ. बबनराव नरसाळे यांच्या शुभहस्ते नारळ वाढवुन पायाभरणी कामाचा शुभारंभ करण्यात
आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डाॅ. बबनराव नरसाळे म्हणाले, मिरी येथील कानिफनाथांचे वास्तव्य असलेले हे जागृत देवस्थान असुन याच्या मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामास नाथभक्तांनी सहकार्य करावे,पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील जागृत देवस्थान कान्होबा उर्फ श्री कानिफनाथ मंदिर हे ७०० वर्षापूर्वीचे अतिशय प्राचीन मंदिर होते. या ठिकाणी कानिफनाथ अनेकवर्ष वास्तव्यास असल्याची पुराणात नोंद आढळते. त्यामुळे नाथभक्त मढीच्या अगोदर मिरी येथे येत असतात. या अतिशय प्राचीन मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती त्यामुळे ग्रामस्थ व ट्रस्टीनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले होते.
सुमारे सात कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या मंदिराच्या पायाभरणी
कार्यक्रमाचा शुभारंभ डाॅ. बबनराव नरसाळे यांच्या हस्ते करण्यात आला. डाॅ. नरसाळे
व श्री दत्त उद्योग समुहाच्यावतीने यावेळी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची
देणगी ट्रस्ट व ग्रामस्थांचे यावेळी जमा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अशोक झाडे, खजिनदार बहिरनाथ गुंड, विश्वस्त संतोष शिंदे, शुभम मोटे, उत्तम झाडे, मच्छिंद्र दारकुंडे, रघुनाथ वेताळ, भालचंद्र गुंड, हरिभाऊ धाकतोडे, आबासाहेब नवल, भाऊराव दारकुंडेसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने
हजर होते.
0 Comments