पाथर्डी - तालुका विधी सेवा समिती व पाथर्डी तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रेणुका विद्यालय मोहटे येथे कायदेविषयक शिबिर संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पाथर्डी न्यायालयाच्या न्यायाधीश ए.एस बिराजदार हया होत्या. यावेळी मोहटे विद्यालय येथे आयोजित कायदेविषयक शिबिरामध्ये पाथर्डी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश ए.एस.बिराजदार यांनी बालकांचे कायदे तसेच संगोपन,आजची शिक्षण पद्धती,संस्कार तसेच विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच न्यायाधीश व्ही.आय.शेख यांनी आजची मीडिया प्रणाली याबद्दल मार्गदर्शन केले तसेच वकील राजेंद्र खेडकर यांनी बालकांचे हक्क व त्यांच्या संदर्भात असलेले कायद्यांची विस्तृत माहिती दिली.
यावेळी पाथर्डी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.आय.शेख तसेच न्यायाधीश एम.डी गौतम हे उपस्थित होते.तालुका वकील संघाचे अध्यक्ष
आर.एन खेडकर वकील, वकील निलेश दातार,वकील अय्याज शेख तसेच वकील आत्माराम वांढेकर, वकील अंबादास खेडकर,वकील नितीन वायभासे,वकील नामदेवजायभाय,वकील उद्धवराव खेडकर,वकील वैजनाथ बडे,वकील प्रतिक वेलदे उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना वकील नितीन वायभासे यांनी तर आभार प्रदर्शन रेणुका हायस्कूलचे
शिक्षक गायकवाड यांनी केले.
0 Comments