अल्पवयीन मुलींचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक

पाथर्डी - शहरातील दोन अल्पवयीन शाळकरी मुली गायब झाल्या प्रकरणी मुलींच्या पालकांनी, अज्ञात इसमाच्या विरोधात अपहरणाच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. सदर प्रकरण पाथर्डी पोलीसांनी अतिशय गांभीर्याने घेऊन, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सचिन लिमकर यांनी वेगाने तपास करत दोन पोलीस पथकांच्या मदतीने दोनही अपहरण झालेल्या मुलींचा शोध लावून अपहरणाच्या गुन्ह्याची उकल करत आरोपींना गजाआड केले आहे.  

पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर, श्रीकांत डांगे, कृष्णा बडे, संदीप बडे, अक्षय लबडे, भगवान गरगडे, संजय बडे, विकी पाथरे, राजेंद्र सुद्रुक, पोपट आव्हाड, ईश्वर बेरड, सागर मोहीते आदींनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेगाने तपासाची चक्रे फिरवून तपास मोहीम राबवुन निवडुंगा शिवारातील हाँटेल पँराडाईज येथे शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी त्या मुली व संबंधित आरोपी तिथे असल्याची खात्री पोलिसांनी पटली होती. यावेळी हाँटेलच्या व्यवस्थापक व कामगाराकडे पोलीसांनी कसून चौकशी केली असता, पिडीत मुली व त्यांचा मित्र यांना पोलिस आल्याचे सांगितल्याने दोन्ही मुली व त्यांचा मित्र हाँटेलच्या मागील दरवाज्यातुन पळुन गेल्याचे सांगितले. हॉटेलच्या मागील बाजूस डोंगर व घनदाट झाडीचा भाग असल्याने, पोलीसांनी सुमारे अडीच तास डोंगरात पायपीट करीत रात्रीच्या अंधारात शोध घेतला. मात्र कोणी आढळून आले नाही. दरम्यान, पिडीत मुलींनात्या आरोपीने शहरातील माणिकदौंडी चौकात आणुन सोडले असता त्या मुली घरी परतल्या.

सोमवारी पोलीसांनी पिडीत मुलींचे जबाब नोंदवत तीन जणांना अटक केली आहे.  त्यातील अत्याचार करणारे दोघे, व त्यांना मदत करणारे चौघे अश्या सहा जणांनी मिळुन हे दोन्ही गुन्हे एकत्रीत केल्याचे उघड झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. या प्रकरणात सागर मोहन उदार रा.निवडुंगा, महादेव बबन चव्हाण रा. शिक्षक काँलनी पाथर्डी, महेश आश्रुबा खेडकर रा. धान्य गोदाम पाथर्डी. या तिघांना सोमवारी सांयकाळी अटक केली आहे. तीनही आरोपींना अहमदनगर येथील विशेष न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने तपास कामी आरोपींना २५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे, यातील तिघे आरोपी अद्यापही फरार असून त्यांच्या शोधत पोलीस पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, पिडीत मुलींच्या जबाबावरुन, लैंगीक अत्याचार व बालकांचे लैंगीक अत्याचारापासुन सरंक्षण, कायद्यानुसार गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली आहे.पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तपास करीत आहेत.दरम्यान, पिडीत मुलींच्या जबाबावरुन, लैंगीक अत्याचार व बालकांचे लैंगीक अत्याचारापासुन सरंक्षण, कायद्यानुसार गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली आहे.

लक्षवेधी मुद्दा - महामार्गचे लगत न्यायालयाने घालून दिलेले नियम मोडून अश्या हॉटेलच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून हॉटेल मध्ये सर्हास अमली पदार्थ विक्री होत आहे. हॉटल आणि लॉजिंग अधिनियम तसेच शासनाने वेळोवेळी पारित केलेल्या अध्यादेश नुसार या ठिकाणी रहिवास करण्यासाठी अनेक नियम घालून दिलेले आहेत मात्र या ठिकाणी नोंदी न ठेवता शासनाचे विविध कर बुडवले जात असून अनेक नियमांना हरताळ फासला जात आहे.केवळ काही तासा साठी खोली भाड्याने देवून हजारो रुपये मिळत असल्याने लॉज मालक खुश आहेत मात्र अल्पवयीन शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी विना चौकशी खोल्या दिल्या जातात,ओळखपत्र पडताळणी न करता नोंदी ठेवल्या जात नाहीत अथवा सी.सी.टी.व्ही.फुटेज जतन केले जात नाही. शहरातील लोकवस्ती मधील तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या लॉज मध्ये या शिवाय महामार्गा लगत असलेल्या काही लॉज मध्ये बाहेरुहून शरीर शय्या करण्यासाठी बायका पुरवल्या जातात यामुळे मात्र सामाजिक स्वास्थ दुषित होत आहे. जिल्ह्याच्या पोलिसांकडून ठराविक अंतराने अश्या ठिकाणी धाडी घालून तपासणी करने आवश्यक आहे.


Post a Comment

0 Comments