
पाथर्डी – (हरिहर गर्जे) ग्रामीण भागात तलाठी हा शब्द जरी उच्चारला तरी गावोगावी तलाठी व
त्यांच्या कार्यालया मार्फत अंमलात आणले जाणारे अनेक किस्से ऐकायला मिळतात,मात्र
या सर्व विचित्र बाबींना फाटा देवून तलाठी या संकल्पनेची नवीन समाजाभीमुख प्रतिमा
निर्माण करण्यासाठी, दुर्गम
भागातील गरीब, वंचित आदिवासी, शेतकरी
वर्गाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्यासाठी, तलाठी पदाचा बडेजाव
बाजूला सारून माणिकदौंडी सजे परिसरात दिवस रात्र झगडणारे तलाठी राजू उर्फ राजेंद्र
मेरड यांनी महसुली क्षेत्रात सकारात्मक कार्याचा नवीन आदर्श उभा केला आहे.
माणिकदौंडी
महसूल सजे अंतर्गत १२ तांडे व २४ वाड्या असे उपविभाग येतात,या परिसरात डोंगराळ व खडकाळ जमीन
असल्याने बहुतेक रहिवासी पोटाचे खळगे भरण्यासाठी उसतोड कामगार म्हणून दरवर्षी
स्थलांतरित होत असतात त्यामुळे शिक्षण आणि विकास या बाबी पासून हे घटक शतका पासून दूर
आहेत. या भागातील अनेक नागरिकांचा तर देश स्वातंत्र झाल्या पासून शासनाच्या विविध योजनेचा
लाभ घेण्यासाठी मतदार यादीत किवा रहिवासी,आधार कार्ड यामध्ये
नोंद नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ यांना देता येत नाही. तलाठी राजू मेरड
यांनी मंडल अधिकारी वैशाली दळवी तसेच पोलीस पाटील वसंत वाघमारे यांच्या सह शिवार
भेटी करून या बाबींचा बारकाईने अभ्यास करून या वंचित घटकांना प्रवाहात आणण्यासाठी
माणिकदौंडी परिसरातील वाड्या, वस्त्या,
तांडे अश्या दुर्गम भागात फिरून जनजागृती केली व स्वत पाठपुरावा करून अधिवासी
बांधवाना जन्म नोंद, मतदान नोंद,आधार
नोंद,जातीची नोंद अश्या प्रकारच्या शासनाच्या मुलभूत
प्रक्रिया पार पाडल्या आहेत. शिवाय शासन हे जनतेसाठी आहे ही संकल्पना स्थानीकात
रुजवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
माणिकदौंडी
येथे गावा बाहेर डोंगरावर तलाठी कार्यालय होते, सुरवातीच्या कालावधीत कार्यालयाची
खूप दुरवस्था झालेली होती, तलाठी
मेरड यांनी स्वतः तसेच लोकसहभागातून कार्यालयात मुलभूत सुविधा उभ्या केल्या,कार्यालय संगणकीकरण करून सी.सी.टी.व्ही.च्या नजरेत आणले,कार्यालयाच्या
आज बाजूचा परिसर वृक्षारोपण करून हरित केला.शिवाय भर दुष्काळातही ही हिरवळ त्यांनी
व् त्यांच्या सहकारयानी कष्टाने जागवली आहे.त्यामुळे कार्यालयात गेल्यावर
प्रसन्नतेचा अनुभव मिळतो,याशिवाय कार्यालयातील भिंतीवर
शासनाच्या मुलभूत योजना,कायद्याच्या तरतुदी यांची सचित्र
माहिती प्रदर्शित करून स्थानिक अडाणी शेतकऱ्यांची जनजागृती करण्याचे काम सुरु आहे.
वंचित
घटकांना माणिकदौंडी महसूल विभागात तलाठी राजू मेरड यांच्या
प्रयत्नातून व माणिकदौंडीच्या मंडळ
अधिकारी वैशाली दळवी, पोलीस पाटील वसंत वाघमारे यांच्या सहकार्यातून ४० आदिवासी जमातीच्या लोकांना प्रथमच जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड,रेशनकार्ड आणि बँक पासबुक प्रांतअधीकारी
देवदत्त केकाण तसेच तहसीलदार शाम वाडकर यांचे हस्ते वितरीत करण्यात आले.
दोन वर्षांपासून महाराजस्व
अभियान अंतर्गत वेळोवेळी पाठपुरावा करून माणिकदौंडी परिसरातील भिल्ल अदिवासी
सामाजातील लोकांच्या समास्या जाणुन घेत अंतर्गत वेळोवेळी तांडे, वाडी वस्तीवर जाउन संबधित नागरिकांकडे तसेचे सरकार दरबारी पाठ पुरावा करून भिल्ल आदिवासी समाजाच्या जवळ पास ४० कुटूंबियांना जातीचे
दाखले आधार कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून वंचीत घटकातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. तलाठी राजू मेरड
यांच्या लोकाभिमुख कर्तव्यतत्परते मुळे माणिकदौंडी दुर्गम परिसरातील आदिवासी तसेच
शेतकरी वेगाने शासनाच्या मुख्य विकासाच्या प्रवाहात येत असून अश्याच लोकाभिमुख
संकल्पना राज्यातील प्रत्येक महसुली सजेत राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
0 Comments