निवडुंगे शिवारात जबरी चोरी

पाथर्डी – निवडुंगे शिवारात शुक्रवारी रात्री १० वाजनेच्या सुमारास अविनाश बाबुराव घोडके यांच्या घरासमोर येवून चार अज्ञात चोरट्यांनी घोडके यांना तसेच त्यांच्या पत्नी व मुलाला मारहाण करून बळजबरीने ७ ग्रम वजनाचे सोन्याचे मनी व मनीमंगळ सूत्र असा ऐवज जबरदस्तीने चोरून नेहला आहे. 

शुक्रवारी दि.०४/११/२०२२ रोजी १० वाजनेच्या सुमारास अविनाश घोडके व त्यांचे कुटुंबीय दैनदिन काम करत होते त्याच वेळी त्या ठिकाणी चार अज्ञात चोरांनी येवून घोडके कुटुंबियांना बेदम मारहाण केली व फिर्यादी अविनाश घोडके यांची पत्नी व मुलाला मारहाण करुन २८,०००/- रु. किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे दोन पळ्या असलेले सोन्याचे मनी व मनिमंगळसुत्र असा मुद्देमाल चोरट्यांनी बळजबरीने ओढुन चोरुन नेला असल्या बाबत फिर्यादी अविनाश घोडके यांच्या फिर्यादी वरून भादवि कलम ३९४ व ३४ प्रमाणे पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ हे करत आहेत.   


Post a Comment

0 Comments