पाथर्डी – तालुक्यातील मिरी गावच्या शिवारात तिसगाव रोडवर तीन अज्ञात
आरोपींनी पल्सर मोटार सायकलवर येवून फिर्यादीच्या मोटार सायकलला आडवी गाडी लावून
कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल संच असा ४१ हजारांचा ऐवज लुटून नेह्ला
असून त्याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादी दशरथ
राधोजी दळवे रा.शेवगाव रोड शिक्षक कॉलनी पाथर्डी,ता.पाथर्डी जि. अ.नगर व त्याची
पत्नी असे त्यांचे मोटार सायकल वरून मिरी येथून तिसगाव येथे येत असताना मिरी
गावच्या पुढे तिसगावरोडने एक ते
दिड किमी अंतरावर मिरी शिवार येथे
असताना फिर्यादीचे पाठीमागुन काळ्या रंगाची पल्सर मो.सायकल व एक काळ्या रंगाची
हिरो डिलक्स नं.एम.एच २० डि.के.३८५८ यावरुन तिन अनोळखी आरोपी तोंडाला मास्क लावुन
फिर्यादीच्या मोटार सायकलला त्यांच्या दोन मोटार सायकली आडव्या लावुन फिर्यादीस अडवुन
फिर्यादीचे व त्याचे पत्नीचे गळ्याला कोयत्यासारखे हत्यार लावुन व धाक धाखवुन १२,०००/- रुपये
रोख त्यात ५०० व १०० रुपयांच्या नोटा तसेच ७,००० /- किमतीचा रेडमी कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल तसेच १२,०००/- रुपये
किमतीचे सोन्याचे ६ ग्रम दोन पळ्या व मनी असलेले सोन्याचे मनिमंगळसुञ तसेच
१०,०००/- रुपये किमतीचे पाच ग्रँम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ४१,०००/- रुपये
किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरी करुन काळ्या रंगाची
हिरो डिलक्स नं.एम.एच २० डि.के.३८५८ यावरुन निघुन गेले याबाबत पाथर्डी पोलिसात भा.द.वी.कलम
-३९२ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments