न्यायालयात गुणदोषावर आधारित निकाल दिला जातो - न्या.एम.डी. गौतम.

पाथर्डी - प्रत्येक नागरिकांना कायदयाचं ज्ञान व्हावं, प्रत्येकाने चौकटीत राहुन आपलं जीवन जगावं त्यामुळे गावात वाद होणार नाहीत तसेच गावातील तंटे व वाद मिटवावेत,न्यायालयात गुणदोषावर आधारित निकाल दिला जातो त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती व्हावी याकरिता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गावागावात मोफत कायदेविषयक सल्ला शिबीरे घेतली जात आहेत असे प्रतिपादन पाथर्डी न्यायालयाचे न्यायाधीश एम.डी.गौतम यांनी केले.

तालुक्यातील कोला येथे पाथर्डी तालुका विधी सेवा समीती, पाथर्डी तालुका वकील संघाच्या वतीने देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त नागरिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पाथर्डी तालुका वकील संघाचे अध्यक्ष आर.एन.खेडकर,उपाध्यक्ष निलेश दातार, सचिव अय्याज शेख जेष्ठ विधीज्ञ दिनकर पालवे, भारत माने, नामदेव जायभाये, आंबादास खेडकर ,उध्दव खेडकर,भारत गोसावी, आत्माराम वांढेकर, प्रवीण राजगुरू, गणेश दानवे, नितीन विघ्ने, आदि प्रमुख उपस्थित होते.पुढे बोलतांना न्या.गौतम म्हणाले की हिंदु कुटुंबात कायद्याने मुला मुलींना समान हक्क मिळाले आहेत.  कुटुंब व्यवस्था बिघडली तर समाजाचे, गावाचे, वातावरण दुषित होते. त्यामुळे कुटुंबातील पती, पत्नी, आई, वडील, मुले, मुली यांच्यात वाद असतील तर ते मिटविण्यासाठी न्यायालयात समोपचाराने प्रयत्न करावेत.वाद मिटले नाही तर न्यायालयात गुण दोषावर आधारित निकाल दिला जातो. कार्यक्रमासाठी सरपंच नवनाथ धायतडक,माजी सरपंच विश्वास गर्जे, संभाजी गर्जे, बाबुराव माने,गंगाधर गर्जे, शिवाजी गर्जे, हरिभाऊ धायतडक, बाबासाहेब गर्जे, सोन्याबापु गर्जे, हनुमंत गर्जे, उध्दव माने, सुधाकर शिरसाट, बप्पासाहेब डुकरे, विश्वनाथ पालवे, मुरलीधर गर्जे, कांता चांगुणे, दिलदार शेख, चंदुभाई शेख, विश्वनाथ थोरात आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. नितीन वायभासे, सुत्रसंचालन नारायण पालवे तर आभार अॅड.संपत गर्जे यांनी मानले.

 

Post a Comment

0 Comments