शेवगाव - दृष्टीदान हे पुण्याचे काम असून
जीवनामध्ये जनसेवेतच खरा आनंद आहे,असे प्रतिपादन बोधेगावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व
उद्योजक प्रभाकर हुंडेकरी यांनी केले.
बोधेगाव येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी व शस्रक्रिया शिबीराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अंधमुक्त व्हिलेज या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटी, रेणुकामाता मल्टिस्टेट शाखा बोधेगाव, रोटरी प्रतिष्ठाण शेवंगाव व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच बोधेगाव येथे नेत्र तपासणी व शस्रक्रिया शिबीर घेण्यात आले.बोधेगाव व परिसरातील रुग्णांसाठी प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला शिबिराचे आयोजन केले जाते.या प्रसंगी संग्राम काकडे, साध्वी बन्नोमा यात्रा कमिटीचे अध्यक्ष कुंडलिक घोरतळे, रोटरी क्लब ऑफ शेवंगाव सिटीचे माजी अध्यक्ष तथा अंधमुक्त व्हिलेज संकल्पना प्रोजेक्टचे चेअरमन बाळासाहेब चौधरी, रेणुकामाता मल्टिस्टेट बोधेगाव शाखेचे मॅनेजर आदिनाथ पांडुळे, सामाजिक कार्यकर्ते राम केसभट, पोस्टरचर्चचे विश्वनाथ भालेराव, कोळगावचे सरपंच साईनाथ झिरपे, पप्पु सुरसे, विठ्ठल कापसे, विशाल गर्कळ, सतिश अकोलकर, चैतन्य शेटे, अमोल अंबुरे, दत्तात्रय झांबरे आदि मान्यवर उपस्थित होते.
शिबिराध्ये बुधराणी हॉस्पिलच्या मनीषा कोरडे यांनी ५२ नेत्र रुग्णांची तपासणी करून ७ रुग्ण ऑपरेशनसाठी निवडले, या रुग्णांवर लवकरच पुणे येथे बुधराणी हॉस्पिटलमध्ये नेत्र शस्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबीर यशस्वीतेसाठी रेणुकामाता मल्टिस्टेटचे विशाल अंधारे, सुशील गायकवाड, वैष्णवी वैद्य यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक बाळासाहेब चौधरी यांनी तर, आभार प्रदर्शन आदिनाथ पांडुळे यांनी केले.
0 Comments