शेवगावात राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध, आंदोलन


शेवगाव - भारत जोडो यात्रे दरम्यान काॅग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बाबत अपमान जनक वक्तव्य केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शेवगाव शहरातील क्रांती चौकात राहुल गांधी यांच्या निषेधार्थ घोषणा बाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, भाजपाचे सुनिल रासने, शहराध्यक्ष रविन्द्र सुरवसे, मनसेचे शेवगाव तालुका उपाध्यक्ष देविदास हुशार,दिलीप सुपारे, गणेश डोमकावळे,केशव भुजबळ,डॉ.नीरज लांडे,महेश फलके, अण्णासाहेब ढोबळे,जगदीश धूत, ज्ञानेश्वर देहाडराय,बाप्पू धनवडे,मछींद्र भडके,किरण काथवटे,अमोल माने, यांच्या सह मनसेचे व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सहा.पोलिस निरिक्षक विश्वास पावरा,गुप्त वार्ताचे बप्पासाहेब धाकतोडे, पो.काॅ. अशोक लिपने पो.कॉ. प्रविण बागुल यांनी याठिकाणी धाव घेत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत जिल्हाधिकारी यांच्या कलम ३७(१) चे उल्लंघन केल्या प्रकरणी गणेश रांधवणे, सुनिल रासने,भाजपाचे शहराध्यक्ष रविन्द्र सुरवसे, मनसेचे शेवगाव तालुका उपाध्यक्ष देविदास हुशार,केशव भुजबळ, डॉ.नीरज लांडे, यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments