पाथर्डी पालिकेचा थकीत कर धारकांचे गाळे सील


पाथर्डी – नगरपरिषदेच्या वतीने दुकान गाळ्याची थकीत भाडे बाकी न भरणाऱ्या दुकानदाराचे दोन दुकान गाळे आज सकाळी पालिका मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या पथकाने सील केल्याने पालिकेचा कर व भाडे न भरणाऱ्या धारकात खळबळ उडाली आहे.



यावेळी पालिकेचे कर निरीक्षक सोमनाथ गर्जे,संजय खोर्दे, त्र्यंबक घुले,परदेशी, गोला,बुगे,दिनकर, अशोक डोमकावळे व आरोग्याचे कर्मचारी यांच्या पथकाने जप्तीची कारवाई करून दोन दुकान गाळे सिल केले.त्यामुळे यांची खबर मिळताच शहारातील ईतर चार  दुकानदार गाळे धारकांनी २.५ लाख थकीत बाकी पालिके कडे जमा केली.पुढील कालावधीत पालिकेच्या थकबाकीदारांवर थेट जप्तीची मोहीम सुरू केली असून त्यामुळे थकीत मालमत्ता धारकात वसुली पथकाची धास्ती वाढली आहे.


Post a Comment

0 Comments