ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांची शिदोरी मुख्यमंत्र्यांना भेट

 

शेवगाव - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर दिवाळी सण साजरा करण्याकरिता जाणार असल्याचे निवेदन नवीन दहिफळ ग्रामस्थांनी तसेच बाळासाहेब सदाशिव शिंदे यांनी  दिनांक १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

बरोबर जनतेच्या प्रश्नासाठी केलेल्या यामागील विविध उपोषणाबाबतचे प्रश्न शिदोरी म्हणून मुख्यमंत्र्यांना दिवाळी भेट देणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.नवीन दहिफळ हे गाव पुनर्वशीत गाव असून या गावातील शिव रस्ते तसेच पाणंद रस्ते हे अत्यंत खराब झाल्याचे चित्र मागील कित्येक वर्षापासून आहे तसेच आहेत. गावातील रस्त्यांचा प्रश्न हा अध्यापही प्रशासनाने सोडवलेला नाही. विशेष म्हणजे नवीन दहिफळ हे गाव पुनर्वशीत असून देखील अद्यापही कोणतीही मूलभूत सुविधेचा लाभ ग्रामस्थांना मिळालेला नाही. दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ रोजी रस्त्याच्या संदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदार यांना तसेच जिल्हाधिकारी यांना दिवाळी सणाविषयी माहिती सह निवेदन सादर केले होते त्याचबरोबर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व अहमदनगर दक्षिणचे खासदार शेवगाव पाथर्डी चे आमदार यांनाही निवेदन सादर केले होते. मात्र झोपलेले हे सरकार आणि प्रशासन यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून गावकऱ्यांना दिवाळी हा सर्वात मोठा आनंदाचा सण नाविलाजाने रस्त्यावर साजरा करण्यास भाग पाडले.

आनंदाचा व लक्ष्मीपूजनाचा सण ग्रामस्थांनी दोडवाणी रस्त्यावर साजरा करून चटणी भाकर हातावर घेऊन खाल्ली ही बाब प्रशासनाची बेजबाबदारी दाखवून देते. त्या दिवशी ग्रामस्थांचे लहान लहान मुले, महिला, युवक, ज्येष्ठ नागरीक सर्वजण बसून रस्त्यावर दिवाळी साजरा करण्याची वेळ केवळ आणि केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षित कामगिरीमुळे ग्रामस्थांना साजरी करावी लागली. ग्रामस्थांना लेखी उत्तर मिळेल व आपले प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. स्थानिक पातळीवरील नगरपरिषद, तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना वेळोवेळी संबंधित प्रश्नांविषयी मागण्या करून देखील प्रशासनाने ग्रामस्थांच्या या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. म्हणूनच दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी तुळशी विवाह दिनी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर साजरी करणार असल्याचे निवेदनात नमूद केलेले आहे. त्याचबरोबर विविध प्रश्नावर संघर्ष करीत असलेल्या प्रश्नांची शिदोरी माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिवाळी भेट म्हणून देणार असल्याचेही नमूद केलेले आहे. जनतेला नुकतेच मुख्यमंत्री सर्वसामान्य लाभले आहेत आणि सर्वसामान्यांचे प्रश्न हे सर्वसामान्य व्यक्ती समजू शकतो अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे व मुख्यमंत्री साहेब गावकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे स्वतः लक्ष देऊन गावकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावतील असा हेतू गावकऱ्यांचा वर्षा बंगल्यावर दिवाळी साजरा करण्या मागचा आहे.मुख्यमंत्री साहेब सर्वसामान्य जनतेच्या समस्या सामान्यच जाणून घेऊ शकतो अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.ग्रामस्थांचे अनेक मूलभूत प्रश्न हे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सदाशिव शिंदे यांनी वेळोवेळी प्रशासनाला पाठपुरावा करून निवेदन देऊन प्रशासनाला गावात मिळावे घेण्यास भाग पाडले व त्यातील शक्य तितके प्रश्न त्यांनी स्वखर्चातून सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच गावातील दिव्यांगांना स्वखर्चाने स्वतः त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्या विविध प्रश्नांचे काम मार्गी लावण्यास मदत केली.गेली कित्येक दिवसांपासून दिव्यांग बांधवांना त्यांच्या अपंगत्वाचे पुरावे देखील निघत नसल्याने शिंदे यांनी स्वतःत्यांच्यासोबत जाऊन स्वखर्चाने सिविल हॉस्पिटल मधून त्यांना पुरावे काढून देण्यास मदत केली. बाळासाहेब शिंदे नेहमीच गावातील दिव्यांग वृद्ध महिला यांना रात्री अपरात्री जाऊन त्यांना विविध अडचणीत स्वखर्चाने मदत करीत आलेले आहेत. समाजातील दुर्लक्षित तसेच भटक्या समाजासाठी शिंदे ही नेहमीच पुढाकार घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावत असतात. बाळासाहेब शिंदे यांच्या वडिलांनी देखील संपूर्ण आयुष्य ही जनतेच्या भविष्यासाठी खर्च केले महाराष्ट्रभर फिरून विविध उपक्रम राबवले मात्र आता ते बिछाण्यावर खेळून आहेत त्यांचाच वारसा बाळासाहेब शिंदे यांनी हातात घेतला आहे.बेरोजगार युवक मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे बुद्धीने दुबळा होत चालला आहे याची तगमग शिंदे यांच्यात दिसून येते. आता माननीय मुख्यमंत्री तसेच प्रशासन यावर काय पाऊल उचलते याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांना जनतेच्या प्रश्नांची शिदोरी

१) वाढती महागाई २) बेरोजगारी ३) जीवनावश्यक खाद्यपदार्थ वरील जी.एस.टी ४)अनुसूचित जाती जमाती भटका समाज यांच्या समस्या ५) दिव्यांग ,निराधार, वृद्ध, विधवा यांच्या समस्या ६) ग्रामीण भागातील मूलभूत गरजा ७) शेतीमालावरील निर्यात बंदी ८)नैसर्गिक आपत्तीतील शेतकऱ्यांच्या अक्रोशाबाबत ९)भारतातील सार्वत्रिक निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याबाबत १०) शहरी भागातील ट्राफिक जाम समस्येबाबत याच प्रश्नांची शिदोरी म्हणून भेट देणार आहे.

 

Post a Comment

0 Comments