![]() |
करंजी - पाथर्डी
तालुक्यासारख्या दुष्काळी भागातील महिलांचे अनेक महत्वाचे प्रश्न असून ते
सोडविण्यासाठी तसेच या भागातील महिलांच्या रोजगाराच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे
साकडे शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक मंगलताई म्हस्के यांनी शिवसेनेच्या नेत्या
निलमताई गोऱ्हे यांना घातले.
पाथर्डी
तालुक्यातील हा दुष्काळी तालुका म्हणुन ओळखला जातो, या भागातील शेतकरी दोन पिकावर
समाधान मानतात त्यामुळे येथील महिलांना बागायत भागाप्रमाणे बारा महिने रोजगार नसतो, त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना रोजगार मिळत
नाही. अशा महिलांसाठी कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी किंवा या भागातील
महिला स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील यासाठी आपण लक्ष घालावे तसेच यासारखे
अनेक महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण लक्ष घालावे असे साकडे शिवसेनेच्या नेत्या
निलमताई गोऱ्हे यांची शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगलताई म्हस्के व
महिलांच्या शिष्टमंडळाने भेट घेवुन घातले.
नगर येथील शासकीय
विश्राम गृहावर मा.आ.निलमताई गोऱ्हे (उप सभापती) येथे त्यांची भेट घेवुन
महिलांच्या प्रश्नावर लक्ष वेधले. निलमताई यांचा नगर दक्षिण शिवसेनेच्यावतीने
यावेळी सत्कार करण्यात आला व महिलांच्या अनेक प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी जि.सं.सौ. मंगलताई राजेंद्र म्हस्के, उप.सं. मंदा
कुलकर्णी, तालुका प्रमुख भगवान दराडे, मिनाक्षी शेरकर, अनघा वाघमारे, मिना आढाव तसेच
अनेक पदाधिकारी, तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments