पारनेर - तालुक्यातील निघोज येथे वीज मीटर बदलून
देण्यासाठी २८०० रुपयांची लाच स्वीकारताना वायरमन आणि ऑपरेटर लाच लुचपत विभागाच्या
जाळ्यात रंगेहात सापडले असून यामुळे वीज वितरण विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांचे निघोज ता.पारनेर शिवारातील शेत गट
न.२१/१९ मधील शेत जमीन असून सदर ठिकाणी दोन खोल्याचे घर आहे,त्या ठिकाणचे इलेक्ट्रिक मीटर जळीत
झाल्याने तेथे नवीन मीटर जोडणी करून देण्यासाठी यातील आरोपी बाह्यस्रोत वायरमन किशोर बाळासाहेब कळकुटे यांनी ३००० रुपये लाच
मागणी केल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असती सदर
पडताळणी कारवाई दरम्यान पंचा समक्ष आरोपी बाह्यस्रोत वायरमन किशोर बाळासाहेब
कळकुटे यांनी तक्रारदार यांचेकडे २८००/- रुपये ची लाच मागणी केली व सदर लाच रक्कम
आरोपी बाह्यस्रोत ऑपरेटर विकास अशोक वायदंडे म.रा.वि.वि.कंपनी निघोज सेक्शन, ता.पारनेर यांचेकडे देण्यास सांगितले,त्यानुसार
म.रा.वि.वितरण कंपनी, कार्यालय, निघोज येथे सापळा आयोजित करण्यात आला,सदर सापळा
कारवाई दरम्यान पंचा समक्ष आरोपी बाह्यस्रोत ऑपरेटर विकास अशोक वायदंडे याने आरोपी
कळकुटे याचे संगणेवरून सदर लाच रक्कम स्वीकारली
असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.सदरील कार्यवाही अहमदनगर लाचलुचपत
प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पो.नि. शरद
गोर्डे,पोलीस उप अधीक्षक, हरीष
खेडकर,पोना
रमेश चौधरी, वैभव
पांढरे, बाबासाहेब कराड,सचिन
सुदृक,चालक हरुन शेख यांच्या पथकाने यशस्वी सापळा कार्यवाही केली आहे.
0 Comments